Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद


जळगाव, (जिमाका) दि. 17 – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागत व पेरणीसाठी पुरक ठरणार असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषि विभागाने केलेले आहे.


कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.7 मिलीमीटर इतके असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर म्हणजेच जून महिन्याच्या सरासरीच्या 40.7 टक्के इतका पाऊस पडला आहे.


जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.


त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय आज (17 जून, 2021) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून महिन्याच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 51.7 मिलीमीटर (38.2 टक्के), भुसावळ- 49.00 मि.मी. (40.5), यावल- 49.5 मि.मी. (38.9), रावेर- 38.1 मि.मी. (30.4), मुक्ताईनगर- 37.1 मि.मी. (36.2), अमळनेर- 11.2 मि.मी. (9.8), चोपडा- 19.6 मि.मी. (15.4 टक्के), एरंडोल- 44.1 मि.मी. (36.5), पारोळा- 86.4 मि.मी. (70.3), चाळीसगाव- 105.2 मि.मी. (81.5), जामनेर- 66.9 मि.मी., (48.5), पाचोरा- 50 मि.मी. (43.2), भडगाव- 47.6 मि.मी. (37.3) धरणगाव- 56.9 मि.मी. (40.6), बोदवड- 24.2 मि.मी. (19.5) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 49.9 मि.मी. म्हणजेच 40.3 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘बार्टी’ तर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण संपन्न

Next Post

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता योजनेबाबत आवाहन

Next Post
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता योजनेबाबत आवाहन

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता योजनेबाबत आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo