Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे शतक, जिल्ह्यातील 110 रुग्णांची कोरोनावर मात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे शतक, जिल्ह्यातील 110 रुग्णांची कोरोनावर मात


जळगाव, (जिमाका) दिनांक 20 – कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 33 जण सायंकाळी (19 मे) आपापल्या घरी परतले. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमधून मान्यवरांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे.


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागू नये तसेच रुग्णांना तातडीने व वेळेवर उपचार मिळावेत. याकरीता जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर, 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. याचठिकाणी रुग्णांचे स्क्रिनिंग, दाखल करुन घेणे, उपचार करणे, स्वॅब घेणे आवश्यकता भासल्यास क्वारंटाईन करण्यात येत आहे. रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 29 टक्के म्हणजेच 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 318 रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 105 रुग्ण अमळनेर तालुक्यातील आहे. तर त्या खालोखाल जळगाव शहर 67, भुसावळ शहर 62 रुग्ण आहे. असे असले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्येही सर्वाधिक 78 रुग्ण अमळनेरचे, भुसावळचे 9, जळगावचे 8, पाचोरा येथील 13 तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.
येथील महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील, डॉ. गायकवाड व त्यांची टीम तर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अहोरात्र मेहनत घेत असून त्यांना लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे.


जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, महानगरपालिकेचे आयुक्त सुतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे व आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून एकाच दिवशी जिल्ह्यातील 33 रुग्ण कोरोणामुक्त होऊन घरी परतले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली सात दिवस होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. खैरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


असे असले तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित राहावे, अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर राखावे, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनपा क्षेत्रातील टू-व्हिलर आँटो स्पेअर पार्ट्सची दुकाने चालू करण्यात यावी -जळगांव टू-व्हिलर आँटो पार्ट असोसिएशनची मागणी

Next Post

आदिवासी लोकांना मोहाच्या सरपंचाकडून स्वखर्चातून मोफत ५०० मास्क चे वाटप , डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाकडून मास्क चे मोफत शिवण काम

Next Post
आदिवासी लोकांना मोहाच्या सरपंचाकडून स्वखर्चातून मोफत ५०० मास्क चे वाटप , डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाकडून मास्क चे मोफत शिवण काम

आदिवासी लोकांना मोहाच्या सरपंचाकडून स्वखर्चातून मोफत ५०० मास्क चे वाटप , डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाकडून मास्क चे मोफत शिवण काम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo