Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात कोविड 19 रुग्ण शोध मोहीम – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात बुधवार 24 मार्च 2021 पासून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर ‘कोविड 19’ रुग्ण शोध मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ऑक्सिजनयुक्त बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा शोध लवकरच होवून त्यांना वेळेत औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या धर्तीवर बुधवारपासून ‘कोविड 19’ शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची माहिती, वय, तापमान, ऑक्सिजनची पातळी, सहव्याधी रुग्ण असल्यास त्याची माहिती, लसीकरण झाले किंवा नाही, कोविड 19 संशयित असलेल्या रुग्णाचे ठिकाण आदी माहिती संकलित केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार होवून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकांना खरी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

या शोध मोहिमेस लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवकांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘कोविड 19’ ची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने चाचणीसाठी संदर्भित करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे डॉक्टरांच्या संघटनांना आवाहन

Next Post

बोदवड येथे कोविड तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post

बोदवड येथे कोविड तपासणी शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo