Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव दुध संघामार्फत लम्पी आजाराकरिता लस उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पशुपालकांच्या जनावरांना लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या आजारामुळे दुध उत्पादक शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा विषाणूजन्य रोग गाई व म्हशी दोघांमध्ये आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार डास, माशी, गोचीड आदींमुळे तसेच बाधित जनावरांच्या खाद्यातून व पाण्यातून होत असतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये जनावराला ताप येतो, शरीरावर गाठी येतात, तोंडात व श्वासनलिकेत फोड येतात. मोठ्या प्रमाणावर लाळ गळत राहते व डोळ्यांवर तसेच पायावर सूज येते.


लंम्पी या त्वचा रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जळगाव दुध संघाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोट पॉक्स लस खरेदी करण्यासाठी पुढाकार घेऊन ५० हजार मात्रा उपलब्ध करून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. सध्या २५ हजार प्रतिबंधक लसीच्या मात्रा दुध संस्थेमार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे तरी तातडीने जनावरांना लसीकरण करण्यात यावे. यामुळे रोगावर प्रतिबंध होवून आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, तरी दुध संस्थांनी दुध संघाच्या पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन दुध संघातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोहिणी खडसे यांनी सुरू केलेला जनसंवाद यात्रेचा उपक्रम कौतुकास्पद;इतरांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात राबवावा…

Next Post

भारतीय हवामान खात्यात रिक्त पदांची भरती

Next Post

भारतीय हवामान खात्यात रिक्त पदांची भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo