जळगाव-(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या जळगाव महानगर जिल्हा पदवीधर प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. शिरीषकुमार भीमराव तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्त्याला मिळालेली ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी असून, यामुळे जळगाव जिल्ह्यातील पदवीधरांचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या संदर्भातील नियुक्ती पत्र दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

नेत्यांकडून मार्गदर्शन आणि शुभेच्छा
श्री. तायडे यांची नियुक्ती राज्याचे नेते मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने झाली आहे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, राज्याचे वस्त्रोउद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे, प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी, विभागीय संघटनमंत्री मा. श्री. रविंद्रजी अनासपुरे, तसेच खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, मा. आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, मा. आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण, आणि मा. आमदार श्री. अमोलजी जावळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व नेत्यांनी श्री. तायडे यांचे नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

संघटन कार्याची पावती
नियुक्ती पत्रात नमूद केल्यानुसार, श्री. तायडे यांनी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी केलेल्या संघनात्मक कामाची पावती म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. यापुढेही ते संघटनेसाठी यापेक्षाही अधिक वेळ देतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
पक्षाच्या विचारधारेवर कार्य करण्याची अपेक्षा
श्री. तायडे यांनी राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, अंत्योदय, मूल्याधारित राजकारण या भाजपच्या विचारधारेवर गाढ विश्वास ठेवून कार्य करावे, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, पक्ष शिस्त, संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीचे पालन करत त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. तायडे यांच्या बहुमूल्य योगदानाने भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी, तसेच सरकार आणि जनता यामधील दुवा बनून केंद्रातील मा. नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रातील नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राला परमवैभवाप्रत नेण्यासाठी कटिबद्ध होण्याची ग्वाही पत्राद्वारे देण्यात आली आहे.
नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे पुनश्च: हार्दिक अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीमुळे जळगावातील भाजपच्या पदवीधर प्रकोष्टच्या कामाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.











