Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन, उडाण फाऊंडेशनचा सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन, उडाण फाऊंडेशनचा सहभाग

जळगाव, दि.२१ – महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त भव्य योग यज्ञचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी १०० ठिकाणी करण्यात आले. जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राने देखील त्यात ऑनलाईन सहभाग नोंदविला.

महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २ हजार संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशनच्या १०० सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीरात सहभागी झाल्या. योग शिबिरे श्री श्री रविशंकरजी यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. पुणे येथील महा एनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून ऑनलाइन लिंकद्वारे घेण्यात येणारे हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टरवर दाखवून २५ ते ५० व्यक्तींच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले गेले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मनसेचे बाळा नांदगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. आर्ट ऑफ लिविंगचे अंकित बत्रा यांनी देशभक्तीपर गीत सादर करीत संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने झाली.

राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून शिबिर पार पडले. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामने फुप्फुसांची कार्यक्षमता तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या शिबिरांचा उपयोग कोरोनापासून बचाव तथा कोरोनामुक्तीसाठी उपाय म्हणून होवू शकतो, शिबिरातील योग आपल्या आयुष्यात नियमितपणे करावे असे आवाहन महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले व मुकुंद शिंदे यांनी केले आहे.

शिबिरात सहभागी प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपक्रमासाठी जळगावात उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, डॉ.भावना चौधरी, डॉ.विद्या चौधरी, मीना लोखंडे, भावना पाटील, प्रवीण चौधरी, रजत भोळे, हेतल पाटील
चेतन वाणी, धनराज कासट, उत्कर्ष चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Next Post
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo