Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात अंगणवाडी तपासणीची “विशेष धडक मोहीम”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यात अंगणवाडी तपासणीची “विशेष धडक मोहीम”

जामनेर – (प्रतिनिधी) – मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.जळगाव डॉ.पंकज आशिया जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पंधरवड्यात अंगणवाडी तपासणी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

राज्यात साधारणपणे हिवाळ्यात मोठ्या संख्येने रोजगारासाठी कुटुंबे आपल्या बालकासह स्थलांतरित होतात व मे अखेरीस सर्वच मजूर आपापल्या गावी परत येतात.परिणामी स्थलांतरांतर कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होणे, बालकांची पोषण स्थिती खालावणे यामुळे अर्भक व बालमृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब लक्षात घेता शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी करणे,लसीकरण प्रलंबीत असलेल्या बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करणे, किशोरवयीन मुली,गरोदर माता,स्तनदा माता यांची तपासणी करणे आणि कुपोषित व तीव्र कुपोषीत बालकांचा शोध घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने तालुक्यात १ जून ते १५ जून पर्यंत विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

जामनेर तालुक्यात ३९६ अंगणवाडी केंद्रातील ३४६७३ बालकांची,२७३८६ किशोरवयीन मुली,१६८७ गरोदर माता ,१४७३ स्तनदा मातांची तपासणी नेमुन दिलेल्या टीमनुसार करण्यात येत आहे बालविकास प्रकल्प अधिकारी पदम परदेशी व महिला बालकल्याण विभागाचे सहकार्य लाभत आहे.या तपासणीतून कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्याचे व्यवस्थापन करून सुधारणा होऊन पुढील होणारे अर्भक व बालमृत्यू टाळता येतील अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सत्यवान महाजन यांचा सेवापुर्ती निमित्त गौरव

Next Post

के सी ई चे आय एम आर मध्ये “जेंन्डर इक्वालीटी” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आणि चर्चासत्र

Next Post

के सी ई चे आय एम आर मध्ये "जेंन्डर इक्वालीटी" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आणि चर्चासत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo