Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात

जामनेर-(प्रतिनिधी) – दि.१६/०१/२१ कोरोनाविरुद्धच्या लढाईत जगातील सर्वात मोठया लसीकरण मोहिमेची सुरवात आज करण्यात आली. महाराष्ट्रात 285 केंद्रांवर व जळगांव जिल्ह्यात 7 ठिकाणी लसीकर केंद्र तयार करण्यात आले आहे त्यामध्ये तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय जामनेर चा समावेश आहे.जामनेर तालुक्याला एकूण 450 डोस पहिल्या टप्प्यात मिळालेले असून तालुक्यात 1745 जणांची नोंदणी यापूर्वीच करण्यात आलेली असल्याची व एका सत्रात 100 लाभार्थींना लस टोचण्यात येणार आहे नोंदणी केलेल्या पैकी कोणी आले नाही तर राखीव यादीतील लाभार्थीना फोन करून बोलवून लस देण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.


उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. कोरोना लस ही सर्वांसाठीच फायद्याची आहे.कोणत्याही लसीचे जसे साईड इफेक्ट्स असतात त्याच प्रमाणे काही सौम्य साईड इफेक्ट्स या लसीचे दिसू शकतात. परंतु स्वतःचे रक्षण व आजार पसरण्याचा धोका टाळण्यासाठी लस फायदेशीर आहे असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.


जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली लस डॉ. जयश्री पाटील यांना देण्यात आली. व्हक्सीनेटवर वनिता जाधव यांनी लस टोचली. मंदा हटकर व कविता नवघरे यांनी लाभार्थीचे तापमान व रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण मोजून ओळख पत्राची पहाणी केली.


वैभव देशपांडे व सागर चौधरी यांनी कोविन अप मध्ये लाभार्थींची एन्ट्री करून लस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार केले.जोत्स्ना सुरवाडे व वैशाली सुतार,मोनाली सावळे,संघमित्रा खंडारे यांनी लस दिल्यानंतर अर्धा तास निरीक्षण केले.कार्यक्रम प्रसंगी जामनेर नगरीच्या नगराध्यकक्षा साधना महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,डॉ.मनोज चौधरी,डॉ.हर्षल चांदा, डॉ.प्रशांत महाजन,डॉ.वैशाली महाजन,डॉ. रमेश पाटील, डॉ.आर.के पाटील,डॉ. गुलाम दस्तगिर, व्ही एच माळी, रवींद्र सुर्यवंशी, एस. बी.सूर्यवंशी, अतुल माळी, रवींद्र कपले,संदीप आसक, विक्रांत परदेशी,किशोर पवार, आशा कुयटे,सुशीला चौधरी, सारिका मांडोळे, वंदना बडगुजर, सिमा पाचपोळ व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रसंगी ईश्वरलाल जैन पथसंस्थेमार्फत कचरूलाल बोहरा यांच्याकडून लस घेतलेल्या लाभार्थींना चहा,बिस्कीट व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 80.23 टक्के मतदान

Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

Next Post
जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पडली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo