Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक संपन्न महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे–जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून “लखपती दीदी” उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समन्वय समिती (DLCC) ची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा लीड बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा, तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना कर्ज सहज मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीत जिल्ह्यातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये –

ठेवी आणि कर्ज वाटपातील तफावत

नाबार्ड कर्ज सहाय्य

क्रेडिट-डिपॉझिट रेशो

किसान क्रेडिट कार्ड वाटप

पीक कर्ज वितरण

वार्षिक पत आराखडा (ACP)

महिला बचत गट आणि वैयक्तिक कर्ज सुविधा

कर्ज वितरण व उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना

पीक कर्ज वाटप: बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज उपलब्ध करून द्यावे.

वार्षिक पत आराखड्याअंतर्गत (ACP) नियोजन: ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कर्ज वितरण व्हावे.

लघु व मध्यम उद्योगांना मदत: उद्योग आणि बँक यांच्यात समन्वय राखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने विशेष बैठक घेण्यात यावी.
भांडवली मदत: लघु व मध्यम उद्योगांना भांडवली सहाय्य मिळावे यासाठी बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ५ फेब्रुवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय आयोजन

Next Post

१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार

Next Post

१० वी व १२ वी परिक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता रद्द होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo