Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा अपघात विरहित करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा अपघात विरहित करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप

जळगाव-(जिमाका)- वाहतुक नियमांचे पालन करुन वाहन चालविल्यास स्वत: बरोबरच दुसऱ्यांच्याही जिविताचे संरक्षण होईल. याकरीता सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून जिल्हा अपघात विरहित होण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी केले. येथील जी. एस. ग्राउंडवर 31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2020 चे उद्घाटन न्या. सानप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटक्के, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे,     उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर आदि उपस्थित होते. न्या. सानप पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांने घराबाहेर पडतांना वाहतुक नियमांचे पालन करण्याचा ठाम निश्चिय करुनच घराबाहेर पडावे. वाहन चालवितांना आपल्याबरोबरच इतरांचीही काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याकरीता सर्व संबंधितांनी वाहतुक नियमांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहनही केले. रस्ते सुरक्षा अभियानाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, वाहतूक नियम आपल्या भल्यासाठीच आहेत याची जाणीव नागरीकांमध्ये होणे आवश्यक आहे.  हेल्मेट वापरणे ही केवळ औपचारिकता न राहता ते वापरल्याने अपघातात आपला जीव वाचू शकतो याचेही भान असणे आवश्यक आहे. प्रवास करतांना आपले संरक्षण आपल्याच हातात आहे याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाला होणे आवश्यक आहे. यामुळेअपघाताचे प्रमाणही कमी होईल. अनेक अपघात हे वेग मर्यादा न पाळल्यामुळे होत असतात. तेव्हा वाहनचालकांनी वाहन चालवितांना वेगमर्यादा पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन म्हणजे आपल्यावर लादलेले आझे न समजता ते आपल्या सुरक्षेसाठी आहे अशी भावना ज्यावेळी जनमानसात निर्माण होईल तेव्हा‍ वाहतुक नियम पालनाविषयी सक्ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक नागरिकाने, वाहनचालकाने आपल्याबरोबरच दुसऱ्याच्याही जिवीताची काळजी घेतल्यास जिल्हा अपघात विरहित होण्यास मदत होईल. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी शहर आणि परिसरात विविध विकासाची कामे सुरू आहे. त्यामुळे नागरीकांनी वाहने चालविताना काळजी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील अपघातांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. हेल्मेटला भार न मानता किंवा केवळ औपचारिकता न समजता ते आपल्या संरक्षाणासाठी असल्याचे मान्य करून ते दुर्देवी अपघातात वरदान ठरत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना मागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राजेंद्र देशमुख व सुनिता मराठे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी मानले. कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस, राज्य परिवहन विभाग, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

का.ऊ. कोल्हे विद्यालयातील आनंद मेळाव्यात शिक्षकांनी चाखली विविध पदार्थांची चव

Next Post

ढील ढील दे दे रे… संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद

Next Post

ढील ढील दे दे रे… संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d