Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत 23 जुन हा जागतिक ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम भारताचे सुविख्यात धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे, अक्षय येवले, नेहा देशमुख, प्राची नाईक, शिवानी देशमुख, रचना म्हस्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


23 जुलै ते 5 सप्टेंबर, 2021 या कालावधीत टोकीयो येथे आयोजित होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धे‍त राही सरनोबत (पिस्तुल शुटींग), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सरवानन (सेलींग) तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग 10 मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमिंग) हे महाराष्ट्राचे आठ खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरीता तसेच जिल्ह्यामध्ये खेळाविषयी वातावरण निर्मिती व्हावी, याकरिता जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूचे छायाचित्र असलेले बॅनर लाऊन राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. अशाप्रकारचे बॅनर पूर्ण जिल्ह्यात लावण्यात येऊन समाजामध्ये खेळाविषयी वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.


याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, रेखा पाटील, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मिनल थोरात, भरत देशमुख, गोविद सोनवणे, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरज पवार हे उपस्थित होते.


सदर कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळके विद्युत उपकेंद्र येथे अधिकारी व कर्मचारी यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर

Next Post

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरु

Next Post
दस्त नोंदणीसाठी नागरीकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा – सह जिल्हा निबंधक सुनील पाटील

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट दस्त नोंदणीसाठी शनिवारी कार्यालये राहणार सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo