Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रचालकांनी अभिलेख अद्यावत ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. १६ – कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अभिलेख्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या असून अशा विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


जिल्ह्यात, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांद्वारे तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणीत बियाणे, खत व किटकनाशके विक्री परवान्याची तपासणी, साठा व भाव फलकदर्शनी भागात लावणे, साठा व विक्री रजिस्टर अद्यावत ठेवणे, विक्रीस ठेवलेल्या सर्व निविष्ठांचा स्त्रोतांचा समावेश परवान्यात करणे, बिल बुक, मुदतबाह्य साठा, कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक प्रदर्शित करणे, गोदामातील खतसाठा तपासणी तसेच मासिक विक्री अहवाल सादर करणे आदि बाबींची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी याप्रमाणे सर्व अभिलेख अद्यावत ठेवावे.


जे केंद्र चालक शेतकरी बांधवांना जादा दराने/अनधिकृत/बोगस कृषि निविष्ठांची विक्री करताना आढळतील तसेच त्यांचे अभिलेख अद्यावत नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असेही श्री. ठाकूर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चिचोली पिंप्रीतील तुकाराम गोपाळ यांची शिवसेना गट प्रमुख म्हणून निवड

Next Post

म्हसावद येथे आरोग्य तपासणी शिबिर

Next Post
म्हसावद येथे आरोग्य तपासणी शिबिर

म्हसावद येथे आरोग्य तपासणी शिबिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo