Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांनी बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी-अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांनी  बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी-अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता शासन स्तरावरून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटाईजर्स, हँड वॉश, हँड ग्लोव्हज व तत्सम बायोमेडिकल साधनांचा वापर केला जात आहे. ही सर्व साधने व उपकरणे बायोमेडिकल असल्याने त्यांचा वापर झाल्यानंतर महापालिका/ नगरपालिका/ नगरपंचायत/ क्षेत्रातील सार्वजनिक कचऱ्याच्या ठिकाणी, उघड्यावर, रस्त्यांवर फेकून दिली जातात. अशा प्रकारचा बायोमेडिकल कचरा उघड्यावर फेकल्याने त्याचे मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बायोमेडिकल कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात अशाप्रकारे आढळून येणारा बायोमेडिकल कचरा गोळा करून त्याची शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिका आरोग्य विभागाची राहील. तर नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या-त्या मुख्याधिकाऱ्यांवर राहील. महानगरपालिका व नगरपालिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी. जे डॉक्टर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर हजर नसतील त्यांना तात्काळ कामावर रुजू होण्यासाठी आदेश देण्यात यावेत.
बायोमेडीकल कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट करणेकामी कोणत्याही व्यक्ती/संस्था/संघटना यांच्याकडून कुचराई अगर उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार सर्व संबंधित शिक्षेस पात्र राहतील. असे अपर जिल्हाधिकारी, जळगाव डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

Next Post

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त

Next Post

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo