Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकअदालतीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका)- वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटावेत. याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दि. 8 फेब्रुवारी, 2020 रोजी करण्यात आले आहे, त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्येही याचदिवशी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचवि यांनी दिली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व  सत्र न्यायालयाच्या आवारात समितीचे अध्यक्षतथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ होईल. जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकेचे आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. या लोकअदालतीमध्ये मोटर वाहन ट्रॉफिक चलन, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित व इतर खटले तसेच खटला दाखलपुर्व प्रकरणे व एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले ठेवण्यात आलेले आहेत.

            या लोकअदालतींमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांच्या संदर्भातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व/दाखलपुर्व खटल्यांमध्ये बॅका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याचे प्रस्तावित केलेले आहे. तरी संबंधित थकित ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.

ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे आहेत. त्या पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे. तरी त्यांनी लोकअदालतीस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हेमंतकुमार सोनार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo