Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात अवयवदान चळवळीस गती मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगांव(प्रतिनिधी)- अवयवदान चळवळीतील कार्यकर्त्यांची राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जळगांव जिल्ह्याधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. २७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय अवयवदान म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो, त्यानिमित्त छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन आणि आनंद डायलेसिस सेंटर जळगाव आणि आर्या फाउंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कक्षात आयोजित कार्यक्रमात अवयवदान चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नीलिमा अहिरराव आणि विमल जोशी या किडनी दात्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या शरीरातील अवयव जिवंतपणी दान करून कुटुंबातील प्रिय व्यक्तीला पुर्नजन्म देणाऱ्या या दोघी महिलांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या “अवयवदान  प्रतीज्ञा” प्रतिमेचे विमोचन या विशेष दिनाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी सर्व शासकीय कार्यालयात या प्रतिमा आगामी काळात लावणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. या प्रसंगी छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशनचे किशोर सूर्यवंशी व आनंद डायलेसिस सेंटरचे डॉ.अमित भंगाळे, आर्या फाउंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी अवयवदान मोहिमेस गती येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले त्यात जिल्हा स्तरावर अवयवदान समिती स्थापन व्हावी, शहरातील सर्व क्रिटिकल केअर सेंटर मध्ये मेंदू मृत जाहीर करण्यासाठी समिती कार्यान्वित होण्यासाठी निर्देश देणे, मेंदूमृत झालेल्या रुग्णाचे अवयव काढण्यासाठी परवानगी शहरातील अद्यायवत रुग्णालयास मिळावी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे उपकेंद्र जळगावात व्हावे, अवयवदान संकल्पपत्र भरण्याची सुविधा सर्व वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात यावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची सुविधा सध्या उपलब्ध झाल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन व सामाजिक संस्था एकत्रितपणे या मोहिमेस गती देण्याचे कार्य नक्की करतील अशी आशा व्यक्त करून अवयवदान मोहिमेस शुभेच्छा दिल्या. प्रसंगी मुसा शेख, छाया किडनी केअर व रिलीफ फाउंडेशन यांनी  आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

Next Post

जळगाव समाजकार्य महाविद्यालयाला महिला व बाल कल्याणमंत्री ना. येशोमतीताई ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट;आ. शिरिषदादा चौधरी यांचा सत्कार

Next Post
जळगाव समाजकार्य महाविद्यालयाला महिला व बाल कल्याणमंत्री ना. येशोमतीताई ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट;आ. शिरिषदादा चौधरी यांचा सत्कार

जळगाव समाजकार्य महाविद्यालयाला महिला व बाल कल्याणमंत्री ना. येशोमतीताई ठाकूर यांनी दिली सदिच्छा भेट;आ. शिरिषदादा चौधरी यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo