Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जीवाची बाजी लावणारे कोरोना फायटर्स आता राहणार सुरक्षित, रायसोनी महाविध्यालयाचा स्तुत्य शोध

पोलीस व आदीचे दैनदिन साहित्य सॅनिटाईज करण्यासाठी पोर्टेबल युव्हीसी सॅनिटायझर बॉक्सची निर्मीती

जळगाव, ता. १३ : आज संपूर्ण जग कोविड १९ सारख्या संसर्गजंन्य रोगा सोबत लढत  आहे. या रोगाची लागण आपल्या शहरात पोहचू नये यासाठी डॉक्टरासह, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार व आदी कोरोना फायटर्स २४ तास ड्युटीवर आपले कर्तव्य गेल्या दीड महिन्यापासून चोख बजावत आहे. परंतु याच डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार व आदीची सुरक्षितता जपली जावी या हेतूने शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्‍यूनिकेशन अभियांत्रिकी  विभागाकडून  उपलब्ध संसाधान आणि साहित्या मधून कोरोना पासून संरक्षणासाठी तंञज्ञानाचा सहाय्याने पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्सची निर्मीती करण्यात आली आहे. ज्यावेळी डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी व आदी कोरोना फायटर्स आपल्या कामावर येतात व काम संपल्यावर घरी जातात तेव्हा त्यांच्या अंगावरील पीपीई कीट, घड्याळ. मोबाईल, व अन्य साहित्य या पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्समध्ये ठेवल्यास खात्रीने ते साहित्य निर्जंतुक होणार आहे व या कोरोना फायटर्सना आपली व आपल्या कुटुंबासहित इतरांची सुरक्षा जपण्यास मदत होणार आहे.

 पोर्टेबल युव्ही- सी  सॅनिटायझर बॉक्स हा अल्ट्रा वायोलेट किरणाचा वापर करुन बॅक्टेरिया आणि वायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारतो. १०० ते २८० नॅनोमीटर, मुख्यता २५४ नोमीटरचे अल्ट्रा वायोलेट किरण हे बॅक्टेरिया आणि वायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारण्यास अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. पोर्टेबल युव्ही- सी  सॅनिटायझर बॉक्स हा ऑर्डिनोया तंञज्ञानाचा उपयोग करुण तयार करण्यात आला आहे. यासाठी ऑर्डिनो सॉफ्टवेअर मध्ये प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन प्रोग्रामिंग करण्यात आलेली आहे. ऑर्डिनो मायक्रो कंट्रोलर हा पूर्ण सॅनिटायझर बॉक्सची सॅनिटायझ करण्याची पूर्ण वेळ आणि प्रक्रिया निर्धारीत करतो. पोर्टेबल युव्ही- सी  सॅनिटायझर बॉक्स हा वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोणा योद्धा यांणि वापरलेले पोषाख आणि साहित्य यांना पूर्णपणे निर्जतूक करतो. युव्ही- सी  सॅनिटायझर बॉक्समधे लावण्यात आलेले युव्ही- एलईडी हे युव्ही- सी  किरणांचा मारा करुन बॅक्टेरिया आणि वायरस यासारखे सूक्ष्मजिवाणूंचा डीएनए निकामी करुन त्यांचा अंत करतात आणि ही पूर्ण प्रक्रीया बाहेर लावण्यात आलेल्या एलइडी  स्क्रिनवर बघता येते. युव्ही- सी किरणांपासून मानवी अवयवांवर होणार्‍या घातक परिणामांपासून बचावासाठी पोर्टेबल युव्ही- सी सॅनिटायझर बॉक्सचे दारे पूर्णपणे बंद झाल्या नंतरच युव्ही- एलईडी काम करायला सुरवात करते. 

पोर्टेबल युव्ही-सी  सॅनिटायझर बॉक्सचे डिझाईन  आणि निर्मीती  रायसोनी  अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलीकम्‍यूनिकेशन अभियांञीकी शाखेचे विभाग प्रमूख प्रा. हरिष भंगाळे व प्रा. मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश सोनवणे, शुभांगी मोरे,ज्योत्स्ना माळी आणि हर्षा वालदे या विद्द्यार्थींनीनी फक्त रु. ६२० इतक्या माफक दरात निर्मीती केली आहे. सदर उपक्रमाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक  श्री. प्रितम रायसोनी,  संचालिका  प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतूक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतीसाठी दिवसा सलग वीजपुरवठा करून बळीराजाचे हाल थांबवा-स्वप्निल सोनवणे यांचे मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्रींना निवेदन

Next Post

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार

Next Post
राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची निवड होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo