Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा पूजन प्रसंगी उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, तुषार बुंदे, अशोक चौधरी, हिमांशू पटेल, किशोर कुळकर्णी, राजेंद्र माळी, सुनील दांडगे, मुरलीधर बडगुजर, अनिल नाईक आणि आनंद पाटील

जळगाव दि. 19 (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा केला गेला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन व छायाचित्रकार राजेंद्र माळी यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे प्रतिनिधीक पूजन करण्यात आले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. 

जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास राजेंद्र माळी, तुषार बुंदे, हिमांशू पटेल, निवृत्ती वाघ, किशोर कुळकर्णी, सुनील दांडगे, उदय महाजन, अशोक चौधरी, अनिल नाईक मुरलीधर बडगुजर आणि आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील आदी उपस्थित होते. 

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान चेअरमन अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. कंपनीतील सर्व छायाचित्रकार एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतात. 

महत्त्वाच्या गोष्टी छायांकीत करण्यासाठी कॅमेरा अत्यंत उपयुक्त साधन आहे. जैन कंपनीच्या इतिहासात देखील विविध कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र जणू दस्तावेजाचे काम करत आहेत. कॅमेरा म्हणजे तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व आजही अबाधित राहिलेले आहे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल अशा प्रवासाला सुरुवात झाली. या बदलत्‍या काळात छायाचित्र काढण्‍यासाठी कॅमेरा असायलाचं हवा असे नाही तर आज प्रत्‍येकांकडे आपला स्‍मार्टफोन आहे. त्‍याच्‍या एका क्‍लिकवर आपण छायाचित्र आपल्याकडे काढून घेऊ शकतो. जगभरातल्या छायाचित्रकारांना प्रेरणा देणारा दिवस असून त्या निमित्ताने उदय महाजन, विकास मल्हारा यांनी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ESIC मध्ये अनेक पदांवर भरती…

Next Post

सोशल वर्क च्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत एन.मुक्ता संघटनेच्या वतीने सहायक आयुक्त समाज कल्याण यांना निवेदन

Next Post

सोशल वर्क च्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत एन.मुक्ता संघटनेच्या वतीने सहायक आयुक्त समाज कल्याण यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo