Wednesday, December 3, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

जळगाव, दि. १४. (प्रतिनिधी)- वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजा बैलांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जैन हिल्सच्या हेलिपॅड पटांगणात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव येथील वीर योद्धा ग्रुपच्या सदस्यांनी ढोल, ताशा, झांझांच्या गजरात आखाडा, पिऱ्यामीड, तलवार दांडपट्टा यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, (गुजरात) नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी सादर केलेले होलीका नृत्य, मानवी मनोऱ्यांमधून साकारलेला श्रीकृष्ण रथ, शिरसोली येथील ढोल, ताशे तर सावखेडा येथील संबळ वाद्याच्या ठेक्यावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व पोळा सणासाठी आलेल्या पाहुण्यांनी नृत्याचा ठेका धरला. मानाचा पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी मिळविला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनिश शहा, स्वरुप लुंकड, पारस राका, विनय पारख, हेमंत कोठारी, प्रतिभा शिंदे, माजी नगरसेवक अमर जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, प्रशिक्षक मंदार दळवी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, डॉ. सुभाष चौधरी, राजा मयूर, फरहाद गिमी, शिरीश बर्वे, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, महिला क्रिकेट खेळाडू, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. जैन हिल्स हेलिपॅडवर पोळ्यासाठी भव्य दिव्य पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.

भारतीय कृषीक्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी १०० वर्षे तरी बैलाविना शेती हे समीकरण अबाधित राहणार आहे. भारतातील ही सॉईल संस्कृती गाय बैलांमुळे टिकून राहिली आहे असे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी आपले विचार व्यक्त केलेल तंतोतंत खरे आहेत. श्रद्धेय भाऊंनी जैन हिल्स येथे पोळा सण साजरा करण्याचा पायंडा सुरू केला आहे तो अव्याहत सुरू आहे असे कार्यक्रमाच्यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

वाडा शिवार सारं, वडिलांची पुण्याई

किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई

तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई

एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई ।।

या काव्य पंक्तीनुसार पोळ्याच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरापासून बैलांची सवाद्य मिरवणूक सुरू झाली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ असलेल्या श्रद्धा धाम, श्रद्धा ज्योत येथे वंदन नमन करून ही मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ आली. सरस्वती पॉईंट येथे नृत्य व काही चित्तथरारक प्रात्यक्षिके झाले. ११ वाजता पोळा फोडला गेला. पोळा फोडल्यावर जैन परिवारातील सदस्यांसह मान्यवरांनी बैलांचे विधीवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा गोड घास भरविला गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर सालदार स्नेहभेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनजे व किशोर कुळकर्णी यांनी केले.

सालदार गडींचा सपत्नीक गौरव…

श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्या कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली अशा विविध ठिकाणाच्या शेती विभागातील ४८ सालदार गडींचा सपत्नीक स्नेहभेट देऊन गौरव केला गेला. त्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, सौ. शैलाताई मयूर, सौ. शारदा चौधरी, अनिश शहा, डॉ. अनिल ढाके, विजयसिंग पाटील, प्रवीण जैन, सौ. निशा जैन, डॉ. भावना जैन, शेती विभागाचे संजय सोनजे या मान्यवरांच्याहस्ते हा स्नेह भेट देऊन गौरव करण्यात आला.

पुरणपोळीचा सुग्रास पाहुणचार…

जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर पुरणपोळी-खीर असा सुग्रास पाहुणचार पोळ्या निमित्ताने होता. ही व्यवस्था राजाभोज खानपान विभागाच्या सहकाऱ्यांच्यावतीने उत्तम केली होती शहरातील निमंत्रीतांसह जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांनी या पाहुणचाराचा लाभ घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते “आयुष्यमान भव’ योजनेचा शुभारंभ

Next Post

शेती, पाणी यातुनच दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

Next Post
शेती, पाणी यातुनच दादांशी ऋणानुबंध – अशोक जैन

शेती, पाणी यातुनच दादांशी ऋणानुबंध - अशोक जैन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d