Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ठाणे कोव्हीड 19 योद्धा” स्वयंसेवकांची फौज तैनात ठाणे महापालिका आयुक्तांचा अभिनव उपक्रम

दिनांक : 6 मे, 2020

ठाणे(6): ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना आळा घालून कोरोना कोव्हीड १९ चा संसर्ग वाढू नये यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून ठाणे कोव्हीड 19 योद्धा नावाने तरूण स्वयंसेवकांची नवीन फळी तयार करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून ठाणे कोव्हीड 19 योद्धाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, त्यास आळा घालण्यासाठी तसेच संचारबंदीचे योग्य पालन व्हावे आणि कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी प्रभाग समिती निहाय स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्याने हे स्वयंसेवक ठाणे कोव्हीड 19 योद्धा म्हणून काम करणार आहेत. सध्या वागळे प्रभाग समिती व लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये हे योद्धा कार्यरत आहेत.

ठाणे महापालिकेच्यावतीने “ठाणे कोव्हीड 19 योद्धा” या नावाने ” घरातच रहा कोरोनाला हरवा ” असा संदेश देणारे विशेष जॅकेट परिधान केलेले हे योद्धा शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरात काम करीत आहेत. विविध कारणे सांगून रस्त्यावर फिरणारे नागरिक, मैदानावर खेळण्यासाठी एकत्र येणारे तरुण, चौका चौकात एकत्र येणारे नागरिक या सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, संचारबंदीचे पालन करावे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळावे आदी गोष्टी बाबत हे योद्धा नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भुसावळातून लखनऊसाठी धावली ‘श्रमिक’ एक्स्प्रेस टाळ्यांचा कडकडाटात 1306 प्रवाशांना दिला निरोप

Next Post

धक्कादायक-जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
65 वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु

धक्कादायक-जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo