Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी, दोषविरहित करण्यासाठी उपमुख्यमंत्र्याच्या  अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन

बारामती(प्रतिनिधी)- डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बारामती तालुक्यात डिजिटल स्वाक्षरित 7/12 वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसिलदार विजय पाटील उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरित 7/12 वाटपाचा कार्यक्रमास सुरुवात होत आहे. हा एक चांगला उपक्रम असून त्यामुळे कामात अचुकता आणि गतिमानता येईल. सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात यावे लागणार नाही. त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत होईल. महसूल विभागाच्या कामात पारर्दशकता येईल.

महसूल विभागाने 50 वर्षानंतर 7/12 उपलब्ध करून देण्याचा पद्धतीत बदल केले आहेत. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी हा डिजिटल 7/12 चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याबरोबरच शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना नियंत्रणासाठी मास्कचा वापर आवशयक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, कोरोना बाधीतांची संख्या वाढणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. नवरात्रमध्ये सर्व धार्मिक ठिकाणे खुली केली जाणार असताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यावी. बारामतीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे पेशंट वाढत असल्याने आरोग्य विभागाने त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील दहा खातेदारांना मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले. तसेच दोन लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचे धनादेशचे वाटप करण्यात आले.उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी प्रस्ताविकात नव्या उपक्रमाची माहिती दिली.

बारामती तालुक्यात खातेदार संख्या 1 लाख 42 हजार 306 व एकूण सातबारा संख्या 82 हजार 721 आहे. डिजिटल 7/12 वाटपाची मोहिम आजपासून 9 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपकार्यकारी अभियंता राहूल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, निवासी नायब तहसिलदार विलास कारे आदी उपस्थित होते

Team Satymev Jayate

Previous Post

महात्मा गांधी संकलित वाङमय जगातील प्रत्येक वाचनालयात उपलब्ध होण्यासाठी दर्शनिका विभागाने प्रयत्न करावा -सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

Next Post
राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 20 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo