Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अर्चना पाटील यांचे आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे निरसन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. अर्चना पाटील यांचे आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे निरसन

नाशिक(प्रतिनिधी)- सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेवून खालील प्रमाणे वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडलीकोविड साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास १०० % रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे.

त्यास अनुसुरून आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगी नुसार गट क मधील ५२ संवर्गातील २७३ ९ रिक्त पदे भरण्यासाठी दि . ५.८.२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्यास अनुसुरून ४०५१६३ अर्ज प्राप्त झाले . याबाबतची परीक्षा मे . न्यास यांचेमार्फत दि . २४.१०.२०२१ रोजी घेण्यात येणार आहे . सदरील भरती परीक्षा राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गांसाठी घेण्यात येत आहे.

राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी ८ उप संचालक मंडळे आहेत . उपरोक्त परीक्षार्थीना प्रवेश पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही दि . १५.१०.२०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु झाली असून आज सकाळी १० वाजेपर्यंत २४१५ ९ ० उमेदवारांनी प्रवेशपत्र download केले आहे . यापैकी २८६ ९ उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत . उमेदवारांच्या तक्रारी प्रामुख्याने खालील स्वरूपाच्या आहेत.

१ ) उमेदवारांनी मागितलेल्या परीक्षा केंद्रापेक्षा वेगळे व दूरचे केंद्र देण्यात आले आहे. वस्तुस्थिती :उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्याचे अंतर्गत येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उदा . उमेदवाराने अकोला विभागातील पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला विभागातीलच परीक्षा केंद्र मिळेल . म्हणजेच उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित आहे . ही अट ठेवली नाही तर कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील . याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल.

२ ) उमेदवारांनी वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज केला आहे व फीस सुद्धा दिली आहे मात्र या सर्व पदांच्या परीक्षा एकाच वेळी होत आहेत त्यमुळे उमेदवारास इतर ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. वस्तुस्थिती: दि . २४.१०.२०२१ रोजी होणारी परीक्षा १४ नेमणूक अधिकाऱ्यांच्या / कार्यालयांच्या अधिनस्त ५२ संवर्गासाठी घेण्यात येत आहे . उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या नेमणूक अधिकार्यांकडे / कार्यालांकडे अर्ज केले आहेत . उदा . एका उमेदवाराने वाहन चालक पदासाठी उपसंचालक पुणे , नाशिक , अकोला येथे आणि सहसंचालक पुणे येथे अर्ज केले आहेत . या उमेदवारास सर्व परीक्षा देण्याची सोय करावयाची झाल्यास वाहन चालकाच्या प्रत्येक मंडळ व सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या १४ रविवारी घ्याव्या लागतील . हीच बाब ५२ संवर्ग आणि १४ नेमणूक अधिकारी / कार्यालांचे बाबत ठरवावयाची झाल्यास या परीक्षा दीड ते दोन वर्ष चालतील . त्यामुळे ५२ संवर्गांच्या परीक्षा २ शिफ्ट मध्ये घेण्यात येत आहेत . तसा . उल्लेखसुद्धा जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच वारंवार notification मध्ये केलेला आहे . उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी यातील पहिल्या शिफ्ट मध्ये १० ते १२ वी शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्ट मध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले आहेत.

३ ) फोटो व सही अस्पष्ट असल्यामुळे ऍडमिट कार्ड मिळत नाही. वस्तुस्थिती: अशा उमेदवरांना न्यासा याना संपर्क साधण्यास कळविले आहे . त्यांना ओळख तपासून प्रवेशपत्रे दिले जाईल.

Team Satymev Jayate

Previous Post

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार

Next Post

कोरोनामुळे हिरावलेल्या विचारवंताचे कार्य लोकांपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. नितीन राऊत

Next Post
कोरोनामुळे हिरावलेल्या विचारवंताचे कार्य लोकांपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. नितीन राऊत

कोरोनामुळे हिरावलेल्या विचारवंताचे कार्य लोकांपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. नितीन राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo