Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
31/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

 

जळगाव दि. 31 ( जिमाका ) शेतक-यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी शेतक-यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील या वर्षात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत अनुसुचित जाती व जमातीच्या शेतक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीसाठी रुपये 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी रुपये 50 हजार, इनवेल बोअरिंगसाठी रुपये 20 हजार, पंप संचसाठी रुपये 20 हजार, वीज जोडणी आकारसाठी रुपये 10, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणसाठी रुपये 10 हजार, ठिबक सिंचसाठी रुपये 50 हजार, तुषार संचासाठी रुपये 25 हजार रुपये इतकी मर्यादा करण्यात आली आहे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत नवीन विहिरीसाठी रुपये 2 लाख 50 हजार, जुनी विहिर दुरुस्तीसाठी रुपये 50 हजार, इनवेल बोअरिंगसाठी रुपये 20 हजार, पंप संचसाठी रुपये 20 हजार, वीज जोडणी आकारसाठी रुपये 10 हजार , परस बागेसाठी रूपये 500, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरणसाठी रुपये 10 हजार, ठिबक सिंचसाठी रुपये 50 हजार, तुषार संचसाठी रुपये 25 हजार, एच. डी. पी. ई. / पीव्हीसी पाईपसाठी रुपये 30 हजार इतकी मर्यादा करण्यात आली आहे.

 

 

तसेच निवड केलेल्या लाभार्थीस नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एका पैकेजचा लाभ घेता येईल. या योजनेच्या लाभाकरीता स्वतःचे नांवे ७/१२ उतारा व ८ अ उतारा, ड-पत्रक (नविन विहीरसाठी किमान ०.४० हेक्टर व इतर बाबीसाठी ०.२० हेक्टर व कमाल ६ हेक्टर जमिन क्षेत्र असणे आवश्यक आहे. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जातीचा दाखला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना) व अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनासाठी). मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला रु.१,५०,०००/- मर्यादा. आधारकार्ड, आधारलिंक बैंक खाते, ७/१२ उता-यावर इतर हक्कदार असतील तर त्यांचे कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र १००/- च्या स्टॅम्पवर, १ मे २००१ नंतर ३ रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला / लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र, ग्रामसभा ठराव, रेशनकार्ड इतके कागदपत्रे आवश्यक असणार आहे. तसेच यापूर्वी शासकिय योजनेतून विहीरीचा लाभ घेतला असल्यात व ७/१२ उता-यावर पूर्वीची विहीरीची नोंद असल्यास विहीरीचा लाभ घेता येणार नाही.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी अनुसुचित जाती / नवबैध्द व आदिवासी शेतक-यांनी महा ई सेवा केंद्रावरुन ऑनलाईन अर्ज www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुंनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कृषि विकास अधिकारी जि.प. जळगाव यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वाहन कर व पर्यावरण कर थकीत असलेल्या स्क्रॅप वाहनांचा लिलाव

Next Post

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

Next Post
जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d