Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवुन द्यावी-अमोल शिंदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रतिनिधी) – पाचोरा व भडगाव तालुक्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत येथील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पाचोरा व भडगावच्या माध्यमातून,आज पाचोरा भागाचे म.प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.


यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी बोलतांना सांगितले की उडीद पिक काढणी च्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेली आहे.तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे.त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले असून.


आम्ही भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून म.प्रांताधिकारी सो.पाचोरा यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे.त्यामध्ये पाचोरा तालुक्यातील १३०७४ व भडगाव तालुक्यातील ५१२६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असुन या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास सूचना द्याव्यात तसेच सदरील पिक विम्यासाठी महाराष्ट्र शासन, कृषि,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांचा शासन निर्णय
क्र.प्रपीवियो-२०२२/प्र. क्र.७२/११-अे दि.१ जुलै २०२१ नुसार (अ.क्र.१०.२)प्रतिकूल हवामान परिस्थिती,(अ.क्र.१०.४) स्थानिक आपत्ती व (अ.क्र.१०.५ )काढणी पश्चात झालेले नुकसानीची भरपाई याचा देखील आढावा घेऊन तात्काळ आपण आदेश निर्गमित करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ शासनास झालेल्या नुकसानीचे अहवाल सादर करणे बाबत कारवाई करावी.अशी विनंती केली आहे.असे अमोलभाऊ शिंदे यांनी बोलतांना सांगितले.


याप्रसंगी भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील किसान मोर्चाचे पाचोरा तालुका अध्यक्ष विश्वास पाटील भडगाव तालुका अध्यक्ष यशवंत पाटील शहराध्यक्ष रमेश वाणी विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ माजी सभापती बन्सीलाल पाटील सरचिटणीस संजय पाटील गोविंद शेलार प्रदीप पाटील नंदू बापू सोमवंशी दीपक माने, महेश पाटील ललिता पाटील ज्योतीताई भामरे संगीताताई पाटील किरण काटकर विनोद महाजन प्रमोद सोमवंशी किरण पाटील पदमसिंह परदेशी शरद पाटील मुकेश पाटील राहुल गायकवाड प्रशांत सोनवणे रहीम बागवान विनोद शेजवळ राकेश कोळी गोकुळ दारकोंडे जगदीश पाटील रमेश श्यामनानी भैया ठाकूर विजय महाजन जीवन राजपूत आदि. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृष्णापुरी हिवरा नदीचा पुलाचे काम लवकर करून नागरिकांचा प्रश्न सोडवला…

Next Post

देशमुख महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा

Next Post

देशमुख महाविद्यालयात देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo