Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ढोल-ताशा पथकातील तरुणींचे मातृत्व धोक्‍यात – डॉ.कल्याणी मांडके

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ढोल-ताशा पथकातील तरुणींचे मातृत्व धोक्‍यात – डॉ.कल्याणी मांडके

ठाणे(प्रतिनिधी) -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध करून मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्‍यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्‌तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. 
नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नथ, मराठमोळे दागिने आणि डोक्‍यावर तुर्रेदार फेटा घालून ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नववर्ष स्वागतयात्रा, गणेशोत्सव, शिवजयंती आदी कार्यक्रमांत ढोल-ताशा पथक दिसतात. वाद्य पारंपरिक असली तरीही त्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरींचा जसा ऐकणाऱ्यांच्या कानांवर परिणाम होतो, तसाच तो वादकाच्या शरीरावरही होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सहा-सात किलोचा ढोल कंबरेला बांधून तासन्‌तास वाजवणाऱ्या तरुणींच्या गर्भाशयाला धक्के बसून त्या कमकुवत होत असल्याने भविष्यात गर्भधारणेत अडचणी येत असल्याची धक्कादायक माहिती पुण्यातील श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ‘सकाळ’ला दिली. डॉ. मांडके यांनी ध्वनिप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे. 
ढोल-ताशे वाजवण्याचा फार मोठा दुष्परिणाम दुर्लक्षित राहिला आहे. ही वाद्ये कंबरेला किंवा पोटाला बांधलेली असतात. त्यांची मूलभूत वारंवारता (फंडामेंटल फ्रिक्वेन्सी) २० हर्टझपेक्षा कमी आहे आणि ती शरीराला अपायकारक आहे, याची नोंद घ्यायला हवी. याचे दुष्परिणाम कालांतराने दिसून येतात. खासकरून तरुणींना याचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, असेही डॉ. मांडके यांनी सांगितले.

ध्वनिक्षेपकांच्या भिंतींना चाप बसला हे फार चांगले झाले. आता परंपरागत वाद्यांबाबतही विचार व्हायला हवा. ढोल-ताशेही ध्वनिप्रदूषणास तितकेच कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांच्याही आवाजाच्या पातळीची नोंद व्हायला हवी. वाद्य किती वेळ वाजवायचे, त्यांची संख्या किती हवी, वादन सुरू असताना मध्येच विश्रांती किती घ्यावी, याचाही विचार आवश्‍यक आहे. यासंदर्भातही न्यायालयीन पातळीवर दखल अपेक्षित आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लैंगिकता म्हणजे?

Next Post

जळगाव मनपा च्या “किरकोळ वसुली” विभागाला पडला विसर

Next Post
जळगाव मनपा च्या “किरकोळ वसुली” विभागाला पडला विसर

जळगाव मनपा च्या "किरकोळ वसुली" विभागाला पडला विसर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d