Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व सक्षम महिला सन्मान प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व सक्षम महिला सन्मान प्रदान

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल , जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त “निसर्ग-मित्र समिती” व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे,श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. सावेर ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सौ. सुरेखा देवरे,चोपडा नगरपरिषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मनिषा जीवन चौधरी, धुळे मनपाच्या नगरसेविका सौ. वंदनाताई संजय भामरे , उद्योजिका सौ. मनिषा किशोर डियालाणी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रेमकुमार अहिरे सर व श्री. वाघ सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे पदाधिकारी सदस्य उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कोमल पाटील यांच्या हस्ते सक्षम महिला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कार्याध्यक्ष आरोही नेवे, रावेर अध्यक्ष भाग्यश्री बाविस्कर, प्रीती चव्हाण, शिवानी बाविस्कर आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना दिव्या भोसले म्हणाल्या , हा गौरव माझा एकटीचा नसून आपल्या सर्व मित्रपरिवाराचा आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद आहेत म्हणूनच मला हे सर्व शक्य आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद आहे मात्र आता माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे .त्यामुळे मी जास्तीत जास्त समाज हिताचे कार्य निश्चितपणे करेल .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिव सन्मान प्रतिष्ठान जामनेर तालुकेच्या वतीने पाळधी येथे जागतिक महिला दिन संपन्न

Next Post

जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू – जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

Next Post
जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू – जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

जळगाव शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्यू – जिल्हाधिकारी यांनी केले जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo