Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुधाला ५ रूपये अनुदान देण्यात यावे -सुशांत कांदळकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
दुधाला ५ रूपये अनुदान देण्यात यावे -सुशांत कांदळकर


जळगांव(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या दूधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर जाहीर करण्यात यावा नाहीतर किमान लिटरमागे ५ रूपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना.सुनील केदार यांना केली आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना या गंभीर परिस्थीतीमध्ये जिवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दूधाला खासगी दूध संस्था व दूध डेअरीला २० ते २२ रूपये प्रति लीटर इतका कमी भाव मिळत आहे. या रकमेतून मुलभूत खर्चही भागविणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाऊन होण्याआधी शेतकऱ्यांच्या दूधाला साधारणत: ३० ते ३२ रूपये भाव मिळत होता. मात्र ग्राहकांना आजही पुर्वीच्याच दरानुसार दूध दिले जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रति लीटर १० ते १२ रूपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच पशुखाद्याच्या किंमती वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत चालला आहे. यावर शासनाने तातडीने योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून जनावरे आजारी पडल्यास त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावर उपचार करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत विषयांत गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाला किमान ३० रूपये प्रति लीटर भाव जाहीर करावा नाहीतर ५रूपये लिटरमागे अनुदान देण्यात यावे अशी मागणी सुशांत कांदळकर यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना. सुनील केदार यांना पत्र व्यवहाराद्वारे केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोहा येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पाणीपुरवठ्याचे उद्घाटन

Next Post

तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३४३ जणांविरुध्द गुन्हे

Next Post
तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३४३ जणांविरुध्द गुन्हे

तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३४३ जणांविरुध्द गुन्हे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo