Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत ब्रँड अँबेसिडर ची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2021
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत ब्रँड अँबेसिडर ची निवड

फैजपूर-(प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाविद्यालयातर्फे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून जयमाला दीपक चौधरी (एम एस्सी द्वितीय वर्ष सूक्ष्मजीवशास्त्र विभाग) व रोहित माधव चौधरी (तृतीय वर्ष विज्ञान संगणक शास्त्र) या विद्यार्थ्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली.

करियर कट्टा या उपक्रमांतर्गत उद्योजक आपल्या भेटीला व आयएएस आपल्या भेटीला अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्राची संपूर्ण तयारी करण्याच्या उदात्त हेतूने महाविद्यालयाच्या करियर कट्टा एककाच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्यात प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या उद्बोधन सभेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना करियर कट्टा संबंधी विस्तृत माहिती देण्यात आली. यासोबत महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक डॉ एस व्ही जाधव यांनी वर्गा- वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना करियर कट्टा संबंधी सखोल माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षभरातून 365 रुपये भरून करियर कट्ट्याचे सदस्यत्व प्राप्त केले व या माध्यमातून करिअरच्या विविध संधी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या काही वर्षात करिअर कट्ट्याच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारीपदी निवड झालेली पाहतांना अत्यानंद होईल असा आशावाद डॉ एस व्ही जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

या कामी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा चौधरी, इतर सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधनी व करियर कट्टा समिती समन्वयक डॉ एस व्ही जाधव, प्रा व्ही सी बोरोले, डॉ कल्पना पाटील, डॉ राजेंद्र राजपूत, डॉ सागर धनगर, डॉ योगेश तायडे, प्रा निखिल वायकोळे, डॉ सरला तडवी, प्रा शेरसिंग पाडवी, प्रा शुभांगी पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात

Next Post

१४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

१४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d