Tuesday, April 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

फैजपूर – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालयात 15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांना डॉ. कलाम यांच्या जीवनातील कार्य तत्परता व देशसेवा जाणून घेण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अनेक ग्रंथ वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना “विद्यार्थी दशेत ग्रंथाला आपले मित्र बनवावे” असा सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते न थांबता, ग्रंथालयातील प्रेरक पुस्तकांचे वाचन करून जीवन समृद्ध करण्याचे आवाहान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ग्रंथपाल आय. जी. गायकवाड यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, प्राध्यापक डॉ. जगदीश खरात, प्राध्यापक विजय तायडे, प्राध्यापक योगेश तायडे यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ग्रंथांचे विशेष प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. उमाकांत पाटील, सौ. यामिनी पाटील, सौ. सुरेखा सोनवणे आणि श्री. भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मू. जे. महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त ध्यान कार्यशाळा संपन्न

Next Post

नवकल्पनेतून व्यवसाय निर्मिती;समाजकार्य महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Next Post
नवकल्पनेतून व्यवसाय निर्मिती;समाजकार्य महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नवकल्पनेतून व्यवसाय निर्मिती;समाजकार्य महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

क्रिकेट फिव्हर ऑन…जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम;जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d