Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नारायण इंगळे अनाथ आरक्षण संवर्गातून पहिला अधिकारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- राज्यसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत अनाथ संवर्गातील आरक्षणातून नारायण इंगळे या तरुणाला प्रादेशिक वन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अनाथ संवर्गातील आरक्षणातून अधिकारी झालेला नारायण इंगळे हा पहिला असून त्याला शुभेच्छा देत त्याचे मी खूप खूप अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

अनाथ बालकांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने सातत्याने पाठपुरावा केला होता.या आरक्षणाद्वारे नारायण इंगळे या तरुणाला नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रादेशिक वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. याबाबत नारायणशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महिला व बालविकास मंत्री ॲङ ठाकूर यांनी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही आपण कायम सोबत असल्याची ग्वाही त्यांनी नारायण याला दिली.

यापुढे होतकरू अनाथ बालकांना आरक्षणाद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होईल असा विश्वास ॲङ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर नारायण इंगळे यांनी अनाथ आरक्षण संवर्गातून नियुक्ती मिळाल्याबद्दल महिला व बालविकास विभाग आणि मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अजंता फार्माकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत; धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द

Next Post

किसान शिक्षण संस्था उद्याची पिढी घडवणारा कारखाना;कर्मवीर तात्या बाबा यांच्या पुण्यस्मरण सांगता प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचे वक्तव्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo