Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नालेसफाईसह रस्ते, पदपथांची सर्व कामे मॉन्सून आगमनापूर्वी पूर्ण करावीत-महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले निर्देश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नालेसफाईसह रस्ते, पदपथांची सर्व कामे मॉन्सून आगमनापूर्वी पूर्ण करावीत-महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले निर्देश

कोविड १९ कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करुन महानगरपालिकेची यंत्रणा मॉन्सूनपूर्व कामेदेखील तत्परतेने करत आहे. या कामांना पूर्ण गती देऊन मॉन्सूनपूर्वी ही सर्व कामे पूर्ण केली पाहिजेत. तसेच, नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसह रस्ते, पदपथ यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. इ. सिं. चहल यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना तसेच प्रत्येक विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी पालिका वरिष्ठ अधिकाऱयांसह सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल (दिनांक २० मे २०२०) हे निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संबंधित अधिकाऱयांनी माहिती देताना सांगितले की, पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांतून गाळ काढून नाला प्रवाही करण्यासाठी कामे सुरु आहेत. तसेच विभाग कार्यालयांमार्फत संबंधित विभागाच्या कार्यक्षेत्रातील छोट्या नाल्यातील गाळ काढण्याची कामे सुरु आहेत. कोविड १९ कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्व कर्मचारी, कामगार यांना जॅकेट, गमबूट यांच्या सोबतीने मास्क, हातमोजे इत्यादी साधनांचा पुरवठा संबंधित कंत्राटदारांमार्फत केला जात असून सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी जास्तीत संयंत्रे उपलब्ध करुन कामे करण्यात येत आहेत. सर्व कामे ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होतील, याचा विश्वास असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. मुंबईतील नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, नालेसफाईची कामे करताना काही कंत्राटदारांनी अल्पवयीन मुलांना नेमल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या असून त्यावर एका आठवड्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहितीदेखील संबंधित अधिकाऱयांनी दिली.

सर्व कामांचा सविस्तर तपशील जाणून घेतल्यानंतर आयुक्त श्री. चहल म्हणाले की, नदी-नाले यामधील गाळ काढण्याची कामे करताना करताना अडथळ्यांची मुख्य ठिकाणे (बॉटलनेक) तातडीने व एका आठवड्यात स्वच्छ होतील, याकडे लक्ष द्यावे. मिठी नदीचे काम ६० टक्के पूर्ण झाले असल्याची बाब समाधानकारक आहे. पर्जन्यवृष्टीच्या कालावधीत मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, अशारितीने आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली पाहिजेत. लहान नाल्यांच्या कामांवर संबंधित परिमंडळांच्या उपायुक्तांनी विशेष लक्ष द्यावे. कामांचा वेग वाढवण्यासाठी आणि निर्धारित वेळापत्रकानुसार गाळ काढण्यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त यंत्रणा नेमावी. नालेसफाईप्रमाणेच रस्ते बांधकाम, रस्ते दुरुस्ती, पदपथ दुरुस्ती यांची सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. कोणत्याही स्थितीत पावसाळा प्रारंभ होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश आयुक्त श्री. चहल यांनी दिले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्हा कोरोना अपडेटस

Next Post
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव जिल्हा कोरोना अपडेटस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d