Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/06/2026
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

जळगाव-(जिमाका)-   जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर नीट (यूजी) परीक्षा दिनांक 21 जून 2026 रोजी होणार असून परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना लागू केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात नीट (यूजी) परीक्षेसाठी एकूण 12 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा काळात केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, 21 जून रोजी परिक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यापासून ते पेपर संपेपर्यंतच्या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, सदर आदेशान्वये परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या 500 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकानेही वरील कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी जारी करण्यात आला असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

Next Post

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo