Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नुकसान भरपाईचा १७६ कोटी रूपयांचा प्रलंबीत मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


मंत्रीमंडळाच्या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला मुद्दा

२०१७ पासून प्रलंबीत असणार्‍या निधीच्या वाटपाचे देण्यात आले निर्देश !

मुंबई / जळगाव दि. १५ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठीचे ७४ कोटी ८८ लक्ष रूपये तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी प्रलंबीत असणार्‍या १०२ कोटी ९ लक्ष रूपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यास या निधीचे तातडीने वितरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले असल्याने आता जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकर्‍यांना तब्बल १७८ कोटी रूपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सदर अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ४३ लक्ष रूपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रूपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठी ७ कोटी ३१ लाख रूपयांची मदत बाकी आहे.

यासोबत २०१७ च्या खरीप हंगामापासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लक्ष रूपयांची मदत प्रदान करण्यात आली असून अजून ११ कोटी ७० लाख रूपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील दुष्काळाबाबत ४०२ कोटी ९७ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून ५० कोटी ७३ लक्ष रूपयांची मदत अद्याप बाकी आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या क्यार हा महा चक्री वादळामुळे झालेल्या हानीचा विचार केला असता ४७९ कोटी ९३ लक्ष रूपयांची मदत शेतकर्‍यांना मिळाली असून अद्यापही ४ कोटी ३३ लक्ष रूपयांची मदत बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीपोटी ११ कोटी ९४ लक्ष रूपयांची मदत मिळाली असून ३५ कोटी ३१ लक्ष रूपयांची मदत अजून बाकी आहे.

अशा प्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लक्ष आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यानच्या नुकसानीचे १०२ कोटी ९ लक्ष रूपये अशा एकूण १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांच्या मदतीचा मुद्दा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला. शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली असल्याने हा मदत निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून देखील तो मिळाला नसल्याकडे ना. पाटील यांनी मंत्रीमंडळाचे लक्ष वेधून घेतले. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यास हा मदतनिधी तातडीने प्रदान करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता जिल्हातील आपत्तीग्रस्तांना १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. लवकरच सदर अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d