Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शरदचंद्रजी कासट(काकाजी) यांच्या वाढदिवसा निमित्त वहितुला व भव्य रक्तदान शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- मानवाची निर्मिती ही ईश्वराची सर्वात श्रेष्ठ कलाकृती. मानवाचे जीवन म्हणजे ईश्वराची देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक नवनवीन प्रयोग करत आपले जीवन निरोगी व सुखकर करण्याचा प्रयास चालवला आहे. असे असुनही मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचेच रक्त दुसर्‍या गरजु मानवाला चालते.असे या कार्यक्रमा वेळी शाळेच्या अध्यक्षा सौ.अर्चना सुर्यवंशी बोलत होत्या. दिनांक १४ सोमवार रोजी नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे सुर्या फाऊंडेशन तर्फे पाळधीचे प्रसिद्ध उद्योगपती मा. शरदकाकाजी कासट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची वहितुला करण्यात आली. व सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे आश्रयदाते भगवान सुर्यवंशी यांनी मा.शरदचंद्रजी कासट यांचे औक्षण करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू दिली आणि केक कापण्यात आला. यानंतर गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यासाठी त्यांचा वहितुला करण्यात आला, ज्यातून गरिब-होतकरु मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. यासह नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व जळगाव वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. ज्यात डॉ. उमेश कोल्हे, निलेश पवार,  संदिप सावळे यांनी शाळेच्या वतीने केलेल्या आवाहनातून जमलेल्यांतर्फे स्वेच्छा रक्तदानाच्या माध्यमातून ४०बाटल्या रक्ताचे संकलन केले. विशेष म्हणजे शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिला पालक वर्गानेही मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या कार्यक्रमाला मा. नरेश खंडेलवाल यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी सुरज झंवर, अनिलजी कासट, जेष्ठ शिक्षक आधार गुरुजी, सुनिल चौधरी, गोपाल सोनवणे, विजय झंवर, पाळधी खु. चे सरपंच चंदुभाऊ माळी, पाळधी बु. चे सरपंच प्रकाश नाना पाटील, पाळधी पो.स्टे.चे सहाय्यक पो. नि. गायकवाड साहेब, शाळेच्या अध्यक्षा सौ अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर, उज्ज्वला झंवर यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post

भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

Next Post
भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

भडगावात राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे प्रचाराचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo