Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 22 : अमरावती जिल्हा ही समृद्ध पक्षीभूमी आहे. मेळघाटसह विविध ठिकाणी वसलेल्या अरण्यांतून, तसेच सर्वदूर रानावनांतून समृद्ध पक्षीजीवन पहायला मिळते. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना पर्यावरणाची जपणूक करणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने वनमाला व इतर संस्थांचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

Maha Info Corona Website

येथील वनमाला बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान, साद फाऊंडेशन, दिशा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्ष्यांसाठी जलपात्र बसविण्याचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा परिषदेचे सदस्य जयंतराव देशमुख, जितेंद्र ठाकूर,अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील गाले, साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रध्दा पाटील,  स्वप्ना पवार, प्रणय मेहरे, गौरव कडू, निलेश चौधरी, अक्षय इंगोले, अभी बारगे, प्रसाद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पक्षीजीवनाचे संवर्धन करण्यासाठी वनमाला संस्थेसह विविध संस्थांनी एकत्र येऊन राबविलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे. जिल्ह्याला जंगल, पक्षी, प्राणीजीवन असा समृद्ध वारसा लाभला आहे. उन्हाळ्यात पक्षी पाण्याच्या शोधार्थ फिरत असतात. त्यांच्यासाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. निसर्गाची जपणूक करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत, हे आश्वासक आहे, अशी भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी विश्रामगृह परिसरात असलेली वृक्षराजी लक्षात घेऊन विविध ठिकाणी जलपात्र बसविण्यात आले. या संस्थांतर्फे इतरही विविध सुमारे दीड हजार जलपात्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विविध धर्मातील प्रभावशाली व्यक्ती-धर्मगुरूंशी मंत्री राजेश टोपे आणि नवाब मलिक यांची चर्चा

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘इंडियन ब्रॉडकास्टर्स’समवेत बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d