Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पदपथ दुरुस्तीच्या कामाचे साहित्य व मातीचे ढिगारे रस्त्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पदपथ दुरुस्तीच्या कामाचे साहित्य व मातीचे ढिगारे रस्त्यावर

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

मुलुंड पूर्वेस लोकमान्य टिळक रोडवर स्टेशन समोर पदपथ दुरुस्तीच्या कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे काही काळ हे काम थांबविण्यात आले होते. पदपथाच्या खोदकामानंतर भर रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत, कर्ब स्टोन्स रस्त्यावरच टाकण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर विशेष वाहतूक नसली आणि नागरिकांची अतिरिक्त वर्दळ नसली तरीही पालिकेच्या कंत्राटदाराने सर्व नियम पाळूनच शिस्तबद्ध काम करणे जरूरीचे आहे परंतु हे होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही कंत्राटदाराचे कामगार काम करताना मास्क नाक व तोंड झाकेल असा न ठेवता हणुवटीवर ठेवून संसर्गाला आमंत्रण देत आहेत. लॉकडाऊनमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे तरीही काम चालू आहे त्याठिकाणी कोणीही पालिका अधिकारी किंवा कर्मचारी कामाचे पर्यवेक्षन करण्यासाठी येत नसल्यामुळे कंत्राटदाराच्या मर्जीने संपूर्णतः रामभरोसे काम चालू आहे. पालिकेच्या कंत्राटप्रमाणे सिमेंट, रेती योग्य प्रमाणात वापरले जात आहे की नाही हे बघायला कोणीही उपस्थित नसतो. खोदकाम आणि दुरुस्ती काम सुरु असताना पालिकेने निश्चित केलेल्या अटींचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. या कामांमध्ये शिस्तबद्धता आणण्याची गरज असून, नियमभंग करणार्‍यांवर पालिकेने कडक कारवाई करणे जरूरीचे आहे. महापालिकेच्या देखरेख पथकाकडून अशांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. लवकरच पावसाळाचा हंगाम चालू होणार असल्यामुळे त्यापूर्वी पालिका प्रशासनाने कंत्राटदारला सांगून रस्त्यांवरील हे मातीचे ढिगारे, कर्ब स्टोन्स उचलून एका बाजूला ठेवायला सांगून रस्त्याच्या टाकलेल्या टाकाऊ वस्तूंचा तात्काळ निपटारा होवून रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे अन्यथा सर्वत्र चिखल होवून पदपथाचे व रस्त्याचे देखील नुकसान होवू शकते व त्यात पालिकेचे नुकसान होईलच त्याचबरोबर करदात्यांच्या पैश्यांचा देखील अपव्यय होवू शकतो.

पालिकेच्या टी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विक्रोळीत महानगर पालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी

Next Post
सावधान! पाकिस्तानी हँकर कडून आरोग्य सेतू अँपच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती होऊ शकते चोरी

उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d