Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तन अभिवाचन महोत्सवात ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
परिवर्तन अभिवाचन महोत्सवात ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन

जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात आज विरेंद्र पाटील लिखित व दिग्दर्शित ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप जोशी, सुचिता पाटील तसेच नाट्यकर्मी-समीक्षक विजय पाठक होते.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या समूहाला आर्थिक संकट तर आहेच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शेतीच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. पण आर्थिकच कारण याला जबाबदार नाहीतर सामाजिक दृष्ट्या देखील शेतीला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे शेती करणाऱ्या तरुण मुलांची लग्न हा गंभीर प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत काम करणाऱ्या तरुणांना अगदी बाहेरून आदिवासी समाजातील मुली लग्नासाठी आणाव्या लागतात.कारण शेतीत कामकरणाऱ्या मुलाला शेतकरी सुद्धा मुली देत नाहीत. लग्नाळू मुलगा तुषार जोशी याने हुबेहूब उभा केला. मुकुंद महाजन, अजय पाटील, रितेश वानखेडे व भारती वैष्णव यांनी समरस होऊन अभिवाचन केले. विरेंद्र पाटील आणि संजीवनी यांच्या लेवागण बोलीतील, वऱ्हाडी बोलीतील हलक्या फुलक्या विनोदांनी रसिकांना खळखळून हसवले, खिळवून ठेवले.आज अभिवाचनाला  प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद होता. जागेअभावी अनेकांना परत जावं लागलं.  आजच्या अभिवाचनाची प्रकाश योजना नितीश पाटील तर  संगीत मानसी पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मनोज पाटील यांनी केले. महोत्सव स्थळी निर्माण करण्यात आलेला अभिवाचनाचा सेल्फी फॉइन्ट प्रेक्षकांच आकर्षणाचं केंद्र बनला आहे. अभिवाचन महोत्सवाला राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. उद्या मुंबई येथील श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित ‘पंतप्रधानास पत्र’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन केले जाणार आहे, उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कानळदा येथे आढळला अजगर जातीचा साप

Next Post

नशिराबाद मधील वार्ड क्र ४मध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आजारात वाढ

Next Post

नशिराबाद मधील वार्ड क्र ४मध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आजारात वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d