Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आखली रणनीती; ना.एकनाथ शिंदेंनी केला गुप्त दौरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आखली रणनीती; ना.एकनाथ शिंदेंनी केला गुप्त दौरा

पाचोरा(प्रतिनिधी)- राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या राजकारणाची माहिती आ.किशोर पाटील यांचे कडून जाणून घेतली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीती बाबत त्यांनी गुप्तगू केली.

शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू रामचंद्र यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले.या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनासह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती.त्यामुळे या भेटीची पाचोरा शहरासह जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा रंगली होती.दरम्यान पाचोरा शहरातील प्रभू रामचंद्र मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीस ना.शिंदे यांचेसह केवळ आ.किशोर अप्पा पाटील, मुकूंद अण्णा बिलदीकर, व नगराध्यक्ष संजय गोहिल हे चारच जण उपस्थित होते. या

बैठकीत अनेक खलबते झाल्याची माहिती आहे. पालिकेअंतर्गत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेत तात्काळ सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे नियोजन केले.मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी ना.शिंदे यांचेवर सोपवली असल्याने त्यांनी अशा प्रकारे गुप्त दौऱ्यांची सुरुवात पाचोऱ्यातून केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्ष व राज्यसरकार पूर्णपणे आ.किशोर अप्पा पाटील यांचे पाठीशी असून त्यांना यानिमित्ताने बळ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती -संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे आदेश

Next Post

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

Next Post
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d