Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा – प्रकाश आंबेडकर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या,आरोपींवर कठोर कारवाई करा – प्रकाश आंबेडकर

पुणे दि. १५ – जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या गावात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

जग एकीकडे कोरोनाशी लढतोय तर भारतात जातीवादी, धर्मवादी लोकांनी पुन्हा एकदा आपला क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (केज) तालुक्यातील वडगाव या ठिकाणी पारधी समाजाचे पवार कुटुंब राहतात. यांच्या जमिनीवरून निंबाळकर कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे वाद चालू आहे. निंबाळकर कुटुंबांनी यापूर्वीही तीन वेळा पारधी समाजाच्या लोकांवर प्राणघातक हल्ला केला आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही किंवा त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले नाही. त्याचा फायदा आरोपींनी घेतला आणि पवार कुटुंबीयांवर काल रात्री जीवघेणा हल्ला केला. त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले. बाबू पवार, प्रकाश पवार त्याची पत्नी जादुई पवार आणि संजय पवार यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

पारधी समाज हा लढाऊ समाज असून ब्रिटिशांविरुद्ध तो स्वतंत्र सैनिकासारखा लढला, मात्र ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगारी जमात ठरवून त्यांच्यावर तसा शिक्का मारून ते निघून गेले. आजही त्यांच्यावर तो शिक्का कायम आहे. त्यामुळे पारधी समाजाची मानसिकता पूर्णपणे मोडण्यास कारणीभूत ठरली. तरीही हा समाज आता नव्याने उभा राहतोय. सरकारी जमिनीवर स्वतःची उपजीविका करतोय. तो आता अभिमानाने जगायला लागला आहे ते इथल्या धर्मवादी, जातीवादी समाजाला पाहवले नाही आणि म्हणून त्यांनी या चार निष्पाप लोकांची निर्घुन हत्या घडवून आणली. या पूर्वीही या समाजवर हल्ला करण्यात आला होता. त्याची दखल घेण्यात आली नाही. शासनाला विनंती आहे की, या निंबाळकर कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. उपसरपंचाला अटक करून सह आरोपी करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अशी माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कळंब मधील एका कोरोना रुग्णाची परिस्थिती गंभीर रुग्णाला सोलापूरला हलवण्यात आले

Next Post

चंद्रकांत दादा! पवार साहेबांना टक्कर देण्याचा विचार तर सोडाच त्याआधी पवार साहेबांचा चेला आमदार भारत भालकेच खूप झाले तुम्हाला – श्रीकांत शिंदे

Next Post

चंद्रकांत दादा! पवार साहेबांना टक्कर देण्याचा विचार तर सोडाच त्याआधी पवार साहेबांचा चेला आमदार भारत भालकेच खूप झाले तुम्हाला - श्रीकांत शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo