Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीचे उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीचे उद्घाटन संपन्न

अलिबाग, दि.29 (जिमाका):- अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले, ते केवळ सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच, याचा लाभ जिल्ह्यातील सर्व जनतेला निश्चित होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रंथालय व व्याख्यान कक्ष इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय सोनुने, सहाय्यक अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले व त्याचे फलित म्हणूनच आजचा दिवस आपण पाहत आहोत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या सर्वांचे बहुमूल्य असे पाठबळ लाभले, त्याबद्दल या सर्वांचे विशेष आभार मानते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुखदेवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विहित कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासकीय इमारत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ग्रंथालय व व्याख्यान कक्षाचे काम उत्तमरित्या पूर्ण केल्यामुळे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. या सर्व कामास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे तसेच प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, असे सांगून शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रुती पांडे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युवकांसाठी खुशखबर; ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया;गृहविभागाची अधिसूचना जारी

Next Post

जिल्हा वार्षिंक योजनेचा निधी यंत्रणांनी विहित कालमर्यादेत खर्च करावा – पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांची विभागप्रमुखांना सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d