Saturday, July 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुणे विभागातील १ हजार २३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

पुणे दि.11 :-पुणे विभागातील 1 हजार 237  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या  3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 1  हजार 953 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  115 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Maha Info Corona Website

यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 926  बाधित रुग्ण असून  1 हजार 139   कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या  1 हजार 630  आहे. कोरोनाबाधित एकूण 157  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच     107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 

सातारा जिल्ह्यातील 119  कोरोना बाधित रुग्ण असून 20  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 264 कोरोना बाधित रुग्ण असून  41  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण  14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 38   कोरोना बाधित रुग्ण असून 28  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 9  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील  18 कोरोना बाधित रुग्ण असून 9  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 34 हजार 64 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32  हजार  366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 671  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी    28 हजार 969  नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून  3   हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण : 

दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : – 

दि. 11.05.2020 रोजी दु. 4.00 वाजेपर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 4, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडसाठी -1, तमिळनाडूसाठी -1 अशा एकूण 8  रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच  दि.11.05.2020  रोजी  सायं 5.00 वा.जबलपूर  (म.प्र.) साठी  व  रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी  रेल्वेगाड्या रवाना होत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धोकादायक धरणांना भेट देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा

Next Post

कोरोना संकटावर मात करण्यासाठी परिचारिकांचे योगदान अमूल्य

Next Post
कोरोना संकटावर मात करण्यासाठी परिचारिकांचे योगदान अमूल्य

कोरोना संकटावर मात करण्यासाठी परिचारिकांचे योगदान अमूल्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo