Friday, July 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ : जिल्ह्यात पुन्हा १२ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

तीन दिवसांत ३४ जण बरे होऊन घरी

यवतमाळ, दि.11 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे गत तीन दिवसांत एकूण 34 जण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यासाठी व प्रशासनासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

Maha Info Corona Website

गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 51 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन जणांचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आल्याने ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 वरून 65 वर गेली. मात्र सोबतच 12 जणांचे रिपोर्ट 14 दिवसांच्या कालावधीनंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 53 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 62 जण भरती आहेत.

सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 49 नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरिता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 1569 आहे. यापैकी 1519 नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर 50 अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह नमुन्यांची संख्या 1422 आहे, असे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात 53 तर गृह विलगीकरणात एकूण 1272 जण आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू

Next Post

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक : १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

Next Post
विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक : १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक : १४ उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रे दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo