Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिस पाटील बनण्याचा मार्ग झाला खुला; अखेर ‘ती’ अट वगळली

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/06/2023
in रोजगार
Reading Time: 1 min read
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.मात्र, यासंदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता.

मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढले आहे.पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा.

उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.अशी राहील प्रक्रिया:- १५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.

२५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

भारतीय रेल्वेत ऑगस्टपर्यंत नवीन मेगाभरतीची अधिसूचना

Next Post

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo