Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पोळ्यानिमित्त नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शहरात 11 शेतकऱ्यांना साज वाटप

जळगाव : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अनेक वर्षापासून अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता तर करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणखी संकटात आहे. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी बांधिलकी म्हणून नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ११ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.

हा अनोखा उपक्रम गेली अनेक वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्या तर्फे करण्यात येत आहे. यंदा करोनामुळे हा कार्यक्रम न करता शेतकर्यांना बोलावून त्यांना लाभ देण्यात आला.  उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि  पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत  नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले. यावेळी आयुष गांधी व ऋषभ गांधी यांच्या पुढाकारातून यंदा हा उपक्रम झाला. पंकज पाटील, नाना धनगर, प्रवीण कुंभार, श्रावण कुमार या सुमिरा परिवारातील कामगारांच्या हस्ते व उपस्थितीत शेतकर्यांना मदत करण्यात आली. प्रसंगी नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी, उद्योजक संजय गांधी, रिकेश गांधी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

धामणगाव, वर्डी, शिरसोली, उमाळा आदी गावांमधील शेतकर्यांना लाभ देण्यात आला. या शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, गेठा असा पोळ्याचा साज टी शर्ट व पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी शेतक-यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिना निमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

Next Post

भडगांव पोलिस निरिक्षकांनी घेतली गणेशोत्सव मंडळाची बैठक

Next Post
भडगांव पोलिस निरिक्षकांनी घेतली गणेशोत्सव मंडळाची बैठक

भडगांव पोलिस निरिक्षकांनी घेतली गणेशोत्सव मंडळाची बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo