Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कृषि प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न;कृषि उपसंचालक अनिल भोकरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) : – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता जिल्हाधिकारी जळगाव यांचे अध्यक्षतेखाली २३ मार्च, २०२२ रोजी कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद या ठिकाणी कृषि  प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण संपन्न झाले या कार्यक्रमास  उपस्थितीत प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद  हेमंत बाहेती, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर,  कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे, विषय विशेषज्ञ उद्यान विद्या डॉ. धीरज नेहते, विषय विशेषज्ञ अन्न प्रक्रिया तुषार गोरे, सिचन धुमाळ, दिनेश गवळी व बँकेचे प्रतिनिधी इत्यादीनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

                प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक लाभार्थ्यांचे सूक्ष्म अद्योगांच्या स्पर्धेत वाढ करणे सर्वकष मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या उद्देशासाठी २३ ते २५ मार्च, २०२२ व २८ मार्च ते ३० मार्च २०२२ या कालावधीत असे एकुण ६ दिवसांचे निवासी प्रशिक्षणास ६० लाभार्थींचे आयोजन करण्यात आले होते.

                प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकुण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल रु. १० लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी केळी पिकावर नविन प्रक्रिया करुन उत्पादन घेणे किंवा सध्या कार्यरत असलेल्या कृषि अन्न प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तरासाठी प्रकल्प पात्र असतील सदरील योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने विकसीत केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

                शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्देश वाहन  (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटीग या घटकाअंतर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्री पर्यंत टप्प्याटप्प्याने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविणेबाबत सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.

 सदरील योजनेअंतर्गत सामाईक पायाभुत सुविधा या घटकांतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी उत्पादन संघ, सहकारी उदयोजक संघ, सहकारी उत्पादक संस्था, शासन यंत्रणा, खाजगी उदयोग यासाठी इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभुत सुविधा जसे शेती उत्पादनाचे वर्गीकरण, ग्रेडींग, कोठार आणि कोल्ड स्टोरज, केळी पिकाच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा घटकाअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे  कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषि विभागाच्या योजनांच्या पारदर्शक व गतिमान लाभासाठी;“एक शेतकरी एक अर्ज” उपक्रम अल्पावधीत यशस्वी

Next Post

अवैधरित्या प्रवाशी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – श्याम लोही

Next Post

अवैधरित्या प्रवाशी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करु नये;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी - श्याम लोही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo