Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भान हि गरजेचे – हेमराज बागुल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भान हि गरजेचे – हेमराज बागुल

जळगाव दि.२०- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे माहितीचा महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे  वापरावे हे सामाजिक भान  प्रत्येकाला असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयाचे संचालक तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग व शिक्षणशास्त्र  व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रभावी जनसंपर्क व त्याचे आयाम” या विषयावर के सी ई सोसयटी व मू.जे.महाविद्यालय यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना बागुल म्हाणाले कि, आधुनिक काळात लोककल्याणकारी राज्यासाठी जनसंपर्क जनसंपर्क हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला आहे. प्रशासकीय, राजकीय, व्यवसायिक , सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात जनसंपर्क हा अतिशय गरजेचा ठरवा आहे. लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती आणि विचारांचे आदान-प्रदान करणे हे जरी गरजेचे असले तरी समाजात वावरताना ज्ञानासोबत परिस्थितीनुरूप भान असणे देखील तितकेच महत्वाचे आहे .प्रभावी जनसंपर्काचा हा मुख्य स्त्रोत आहे.हे विसरता कामा नये. स्वतःचे विचार मांडण्यासाठी आज सोशल मिडियासारखे प्रगल्भ व्यासपीठ उपल्ब्ध झाले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे माहिती ही कोणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. मात्र यातून कमाल आणि किमान ज्ञान कोणते आणि ते कसे घ्यावे हे देखील तितकेच गरजेचे आहे. सध्या शैक्षणिक दृष्ट्या मोठी गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली असली तरी प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने करियरच्या संधी आजचा युवकाला गवसत नाही .सोशल  मिडिया हाताळताना तसेच अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत जगात काय घडते आहे याची सखोल व खडा -खडा माहिती आजच्या युवकाला असल्यास तो करियर ची संधी स्वतःसाठी निर्माण करू शकतो .असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना मांडले. यावेळी के.सी.ई.सोसायटीचे सहसचिव अँड.पी.एन.पाटील ,प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, के.सी.ई.चे अँकेडमिक डायरेक्टर दिलीप हुंडीवाले,शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आर.राणे,आँटोनॉमस इंचार्ज डॉ.एस.एन.भारंबे ,विभागप्रमुख  संदीप केदार ,सुभाष तळेले ,जैन इरिगेशन च्या जनसंपर्क विभागातील किशोर कुलकर्णी तसेच प्रा.शमा सराफ, के.जी.कुलकर्णी तसेच सौ. नीता बागुल,प्रा.प्रशांत सोनवणे ,प्रा.केतकी सोनार ,विद्यार्थी ,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .प्रास्ताविक प्राचार्य उदय कुलकर्णी ,सुत्रसंचालन अपूर्वा वाणी,मान्यवरांचा परिचय विभागप्रमुख प्रा.संदीप केदार व आभार ए.आर.राणे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

Next Post

मुक्त विद्यापीठ बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया अंतिम मुदत ३१ जुलै

Next Post

मुक्त विद्यापीठ बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया अंतिम मुदत ३१ जुलै

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo