जळगाव -के. सी. ई सोसायटी संचालित एम. जे. कॉलेज, जळगाव, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातील प्रा. ज्योती वाघ यांना निर्वाण युनिव्हर्सिटी, जयपूर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांनी “प्राणायाम और मुद्रा का व्यसनाधीन व्यक्तियों के चिंता, अवसाद और तनाव पर होने वाले प्रभावों का अध्ययन” या विषयावर सखोल संशोधन केले. या अभ्यासात व्यसनाधीन व्यक्तींवर प्राणायाम व मुद्रांचा नियमित सराव करवून मानसिक आरोग्यावर त्याचा मानस शास्त्रीय चाचणीद्वारा परिणाम तपासण्यात आला. संशोधन निष्कर्षांनुसार प्राणायाम व मुद्रा यांचा चिंता, अवसाद व तणाव कमी करण्यावर लक्षणीय सकारात्मक परिणाम दिसून आला.
डॉ. रुपाली गुप्ता यांच्या मार्गदर्शनात आणि डॉ. देवानंद सोनार यांच्या सह- मार्गदर्शनात हे संशोधन कार्य त्यांनी पूर्ण केले.
प्रा. ज्योती वाघ यांना आपल्या संशोधन प्रवासात निर्वाण युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रो. एस. एल. गोदारा, निर्वाण युनिव्हर्सिटी रिसर्च डायरेक्टर डॉ. राजेश कुमार कासवान, डॉ. सपना नेहरा, डॉ. पीयूष कुमार कमलेश, डॉ. रीना आनंद, तसेच एम. जे. कॉलेज ग्रंथालयातील अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे दादा, एम. जे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे, प्रा. पंकज खाजबागे, श्रद्धा व्यास आणि जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री. नितिन विसपूते, प्रतीक विसपुते व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री.साहेबराब पाटील, सुधीर वसाने आणि अंजली पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

प्रा. ज्योती वाघ या यादव देवचंद पाटील विद्यालय मेहरूण येथील शिक्षक श्री. देविदास वाघ यांच्या पत्नी असून त्यांचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल केसीई सोसायटीचे माननीय अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणविस, यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.











