Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वी. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लुटला थ्रीडी चित्रपटाचा आनंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/03/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी)-केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प वि पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पीव्हीआर सिनेमा येथे थ्रीडी चित्रपटाचा आनंद लुटला इतिहासाबरोबरच तंत्रज्ञानाची ओळख करून देत उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद लुटण्याचा एक क्षण मोकळा करून दिला. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी  हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी पीव्हीआर सिनेमा येथे गेले चित्रपट हा थ्रीडी असल्याने विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला टाळ्या वाजवत व मोठ्याने घोषणा देत विद्यार्थ्यांनी तानाजीच्या प्रत्येक कृतीला भरभरून प्रतिसाद दिला.
कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी ” आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे ” ही सेनापती  तानाजी मालुसरे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी घेतलेली शपथ व त्याच्या प्रतीपूर्तीसाठी केलेला लढा तसेच ” गड आला पण सिंह गेला ” असे अभिमानाने निघालेले छ्त्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार विद्यार्थ्यांनी यावेळी प्रत्यक्ष अनुभवले.छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , तनाजींचा विजय असो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी सिनेमाच्या शेवटच्या दृष्याप्रसंगी दिल्या.
सिनेमा मॅनेजर आकाश सिंग तसेच स्टोअर मॅनेजर वासुदेव पाटील तसेच पीव्हीआर सिनेमा मधील सर्व कर्मचारी वृंद, शाळेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकांना अनमोल असे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मूकनायक पत्रकारिता २०२० साठीचे “जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार “करिता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “अॉरेंज कलर डे” उत्साहात साजरा

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात "अॉरेंज कलर डे” उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo