Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान ची दानपेटी लांबवली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
फैजपुरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान ची दानपेटी लांबवली

फैजपूर(प्रतिनिधी) – पोलीस कर्मचारी कोरोना संसर्ग च्या निर्मूलनासाठी दोन हात करण्यात व्यस्त असल्याचा फायदा चोरट्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे . शहरातील यावल रोडवरील जे.टी.  महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील युनियन बँकेचे ए.टी.एम. अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे खंडोबा देवस्थानातील दानपेटीत चोरट्यांनी लांबविली या घटनांमुळे एकीकडे कोरोना ची चिंता तर दुसरीकडे चोरट्यांची भीती असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. यावल रस्त्यावरील युनियन बँकेचे ए.टी.एम अज्ञात चोरट्यांनी दि. 6 रोजी सायंकाळी 6 वाजे पूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला मात्र चोरट्यांनी ए.टी.एम. चे तसेच त्यात त्यातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चे नुकसान केले या घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी प्रेरणा सिंग यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान माहिती मिळताच स.पो.नि. राहुल वाघ फौजदार रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपास फौजदार रोहिदास ठोंबरे करीत आहे. तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान मधील महादेव मंदिरातील दानपेटी व पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी लांबविली ही घटना 30 मे रोजी घडली देवस्थानचे मठाधिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज हे मध्य प्रदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर दि. 6 रोजी मंदिरातील सेवेकरी पवन कुमार यादव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दानपेटीतील चार हजार रुपये व दोन हजार किमतीची पाण्याची मोटर असा एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फैजपूर पोलीस स्टेशन ला सदर घटना संदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस विलगिकरण झाले आहे. तक्रार घेण्यासाठी कोणीच नाही. असे पोलीस स्टेशन मधून सांगण्यात आले. फिर्याद देणार्यानी परतीचा मार्ग त्यावेळेस धरला होता . आठ दिवस झाल्यावर दि ७ जून रोजी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलिसांनी केली . सदर घटने संबंधित तपास हेड कॉन्स्टेबल इक्बाल सय्यद करीत आहे. सदर चे चोरटे हे CCTV कॅमेरा मध्ये कैद असून ओळख पटल्यावर पोलीस गुन्हाच छडा लावतील असे समजते. या खंडोबा देवस्थान मध्ये दि. ५ ऑगस्ट २००२,  दुसरी घटना ९ मार्च २००३ मध्ये अश्या घटना घडलेल्या आहे. या पाठोपाठ ही घटना घडल्याने दहशत निर्माण झालेली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फैजपुर मध्ये पुन्हा एक रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; सील केला खुशाल भाऊ रोड

Next Post

जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबवा – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

Next Post
जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबवा – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबवा – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d