Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बौध्दीक आणि मानसिक विकासासाठी आहारात घ्या आयोडिनयुक्त मीठ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
बौध्दीक आणि मानसिक विकासासाठी आहारात घ्या आयोडिनयुक्त मीठ

आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणारे विविध आजार हे सार्वजनिक आरोग्यासमोर असलेली गंभीर समस्या आहे. आपली मुलं ही आपल्या देशाची गुंतवणूक आहेत, म्हणूनच त्यांना “देशाची संपत्ती” असे संबोधल्या जाते. म्हणून मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वत:ला तसेच आपल्या मुलांना वाचविने ही काळाची गरज आहे.

सध्या जगात 1.5 बिलीयन पेक्षा अधिक लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजाराने ग्रासले आहेत. तर 200 मिलियन पेक्षा अधिक भारतीय लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे उदभवणाऱ्या धोक्यांना सामोरे जात आहेत. तर 71 मिलियन लोक गलगंड आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे भारत सरकारने केंद्र सहाय्यीत राष्ट्रिय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरु केला. या माध्यमातून भारतातील सर्व भागातील लोकांना वेगवेगळया माध्यमांव्दारे “आयोडिन युक्त मीठ” रोजच्या आहारातून घेण्यास आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

“आयोडिन” हे महत्वपूर्ण खनिज द्रव्यांपैकी एक खनिज असून शरीरातील साधारण थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य, वाढ आणि विकास होण्यास अत्यंत आवश्यक घटक आहे. आहारातील आयोडिन शरीराच्या भैतिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असते. आयोडिनची 90 टक्के गरज अन्नातून आणि 10 टक्के आयोडिन पाण्यातून मिळते. समुद्राच्या 1 लिटर पाण्यात 0.05 मि.ग्रॅम (0.05 पी.पी.एम.) आयोडिन असते. समुद्रापासून तयार होणाऱ्या मीठात फक्त 0.28 पी.पी.एम. आयोडिन असते. म्हणून मीठाच्या आयोडीनीकरणासाठी साध्या मिठात पोटॅशिअम आयोडेट वापरले जाते. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरणे कां आवश्यक आहे? आपल्या गळयामध्ये वरच्या भागात थॉयरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी आयोडिनचा उपयोग करुन थायरॉक्झीन (टी-4) आणि ट्राय-आयडोथायरॉक्झीन (टी-3) नावाचे हार्मोन्स तयार करते. शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी या होर्मोन्सची आवश्यकता असते.

थॉयरॉक्झीन कमी पडल्यास व्यक्ती निरुत्साळी बनते. लवकर थकवा येतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विविध आजार म्हणजेच- गलगंड, मानसिक दुर्बलता, मुकेपणा, बहिरेपणा, तिरळेपणा, उभे राहण्याची आणि चालण्याची क्षमता कमी होणे, अवयवांची वाढ खुंटणे इ. विकार संभवतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आयोडिनच्या कमतरतेची समस्या अधिक आढळते.

पौंगंडावस्थेत आणि पुरुत्पादनक्षम वयात त्याची तीव्रता अधिकअसते. गर्भपात, उपजत मत्यू, जन्मात दोष्, अर्भक मत्यू मधील वाढ, मतिमंदपणा, तिरळेपणा, खुजेपणा, मनोव्यापारातील दौर्बल्य, नवजात हायपोथॉयराडिझम, बाल्यावस्थेतील हायपोथायराडिझम इत्यादी आजार उदभवतात. याशिवाय आयोडिनच्या कमतरतेमुळे “क्रेटिनिझम” हा आजार होतो. गर्भपणाच्या काळात मातेला आयोडीनची कमतरता असल्यास अर्भकाच्या शारीरिक आणि मेंदूच्या वाढीवर दुष्परिणाम होवून कायमचे अपंग येऊ शकते. अशी मुले जन्माला आल्यानंतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे चालू किंवा बोलू शकत नाहीत. म्हणूनच आयोडिनयुक्त मीठाला अनन्य साधारण महत्च आहे. प्रौढ व्यक्तिला दररोज साधारणत: 150 मायक्रोग्रॅम इतके आयोडीन लागते.

गर्भवती आणि स्तनदा मातांना मात्र 200 मायक्रोग्रॅम इतके आयोडिन आवश्यक असते.खाण्याच्या मीठाचे आयोडिकरण हा आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्याचा साधा सोपा परिणामकारक उपाय आहे. सर्वसाधारणपणे आपण दररोज 10 ग्रॅम मीठ खात असतो. आपण 15 पी.पी.एम. एवढे आयोडिन असणाऱ्या आयोडिनयुक्त मीठाचे सेवन केल्यास आपली दैनंदिन आयोडिनची गरज पूर्ण होऊ शकते.

डॉ. श्रीराम गोगुलवार प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,नागपूर

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र देण्याच्या विशेष मोहिमेला मुदतवाढ

Next Post

सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Next Post
सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d