Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भवरलाल & कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भवरलाल & कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

सौ. ज्योती जैन, सौ. संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे सचिव विजय वाणी व पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या सदस्या.

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी) – ‘गुलाबी रिक्षा चालवून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. कष्टकरी, गोरगरीब महिलांना ऑटो रिक्षा घेण्यासाठी लागणारी अग्रीम रक्कम देऊन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने त्यांचा जीवनमार्ग सोपा केला व त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.’

पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन अग्रीम रक्कमेसाठी आर्थिक सहाय्य केले त्याचा छोटेखानी कार्यक्रम गांधी तीर्थला पार पडला. त्यासाठी सौ. ज्योती जैन, सौ. संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे सचिव विजय वाणी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली. १५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अतुल शक्ती ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी सौजन्य केले. या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी देखील पैसे नाहीत ती अडचण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आली त्यानुसार त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठान सेवावस्ती विभागाच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

Next Post

नगरसेवका विरोधात बातमी लावण्याचा राग आल्याने पत्रकाराला धमकी;महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भडगांव तहसिलदारांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d